८. केरोसीनचे वाटप व वितरण
केंद्र शासनाकडून राज्यास एप्रिल १९९९ ते जानेवारी २००० या कालावधीत दरमहा १,६८,९७२ कि.लि. केरोसिन प्राप्त होत होते. त्या नियतनात कपात होऊन एप्रिल, २०१० पासून मे, २०११ पर्यंत १,३०,३५६ कि.लि. केरोसिन नियतन प्राप्त झाले. सदर नियतनात जून, २०११ तसेच एप्रिल, २०१२ पासून पुनश्य कपात झाली आहे. त्यानुसार मार्च, २०१३ पर्यंत राज्यास दरमहा ७५,६४८ कि.लि. ऐवढे केरोसीन प्राप्त झाले. केंद्र शासनाने राजयाच्या केरोसीन नियतनात महो एप्रिल, २०१३ या महिन्यापासून पुर्वीच्या केरोसीन नियतनात सुमारे १९.५० टक्के कपात केली आहे.

सन २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ ची राज्याची केरोसीनची मासिक मागणी व दरमहा प्राप्त नियतन (कि.लि.)
एप्रिल,२०१२ ते डिसेंबर,२०१३ मधील जिल्हानिहाय दरमहा मंजूर केलेले केरोसीन नियतन
राज्यातील घाऊक तसेच किरकोळ केरोसीन विक्रीचे दर
राज्यात घाऊक तसेच किरकोळ केरोसीन विक्रीचे दर जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी आणि मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात नियंत्रक, शिधावाटप संचालक, नागरी पुरवठा मुंबई हे निश्चित करतात. सद्यःस्थितीत मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील केरोसीनचे किरकोळ विक्रीचे दर रू.१५.०५ प्रति लिटर आणि इतर जिल्हयात सुमारे रू.१५.०५ ते १६.२२ प्रति लिटर या दरम्यान आहेत.
विशेष सवलतीच्या दराने केरोसीनचा पुरवठा
केंद्र शासनाच्या धोरणानुसार १६ जून, १९८८ पासून राज्यातील डोंगराळ भागाकरिता विशेष सवलतीच्या दराने केरोसीनचा पुरवठा करण्यात येत आहे. सदरहू योजना धुळे, नाशिक, ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आणि रायगड या ११ जिल्हयातील ६२ तालुक्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
राज्यातील केरोसीन वाटप परिमाण
केरोसीन परवानाघारकांचे कमिशन
१. घाऊक परवानाधारक
- रू.४३८.२४ प्रति कि.लि.
२. अर्धघाऊक परवानाधारक
-
रू.२०० प्रति कि.लि.
३. किरकोळ/ हॉकर्स परवानाधारक
- रू.२५० प्रति कि.लि.
केरोसीनचा गैरवापर होऊ नये यासाठीच्या उपाययोजना
- सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून देण्यात येणारे केरोसीन निळया रंगाचे करण्यात आले, ज्यामुळे केरोसिनची अफरातफर ओळखणे सोपे जाते,
- राज्यात सर्वत्र सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील केरोसीनचे वाटप केवळ शिधा/ पुरवठापत्रिकेवर करण्यात येत आहे. यासाठी ज्यांचेकडे शिधा/पुरवठापत्रिका नाहीत त्यांना शिधा/पुरवठापत्रिका देण्याच्या आणि ज्या गावात किरकोळ विक्रेते नाहीत तेथे किरकोळ विक्रेत्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
- किरकोळ विक्रेत्यांनी केरोसीन वाहतूक करताना परस्पर विल्हेवाट लावू नये याकरिता द्वारपोच योजनेंतर्गत जिल्हयातील कमीत कमी ५०% गावातील किरकोळ वितरकांच्या व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत केरोसीन पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे.
- राज्यात केरोसीन वितरणात सुसूत्रता व संनियंत्रण ठेवण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकार्यां ना दिलेल्या आहेत. त्यानुसार केरोसीन परवानाधारकांच्या नियमित तपासण्या करण्यात येतात. तसेच केरोसीन परवानाधारक व पेट्रोल/ डिझेल पंपावर अचानक धाडी टाकण्यात येतात व दोषी व्यक्तींविरूध्द आवश्यक ती कारवाई केली जाते.