केंद्र शासनाने फेब्रुवारी, २००१ पासून फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांनाच साखरेचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांनाच नियंत्रित साखरेचे वितरण करण्यात येत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांना अधिक साखर मिळावी याकरिता प्रतिमानशी ४२५ ग्रॅम ऐवजी ५०० ग्रॅम परिमाण ठरविण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करावयाच्या नियंत्रित साखरेचा किरकोळ विक्रीचा दर केंद्र शासन निश्चित करते. दि.१ मार्च,२००२ पासून नियंत्रित साखरेचा किरकोळ विक्री दर रू.१३.५० प्रति किलो असा आहे.