१५. शासकीय गोदामे
गोदामांची संख्या व धान्य साठवणूक क्षमता:–
शासकीय गोदामांची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी नवीन गोदामाच्या बांधकामाचा बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी टप्पा-१७ अंतर्गत प्राप्त कर्ज सहाय्यामधून नवीन गोदाम बांधकामासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. सन २०१०-११ ते सन २०१३-१४ मध्ये सद्यस्थितीत २३५ गोदाम बांधकामाना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून १२८ गोदाम बांधकामांना रु.१११.०४ कोटी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या १२८ गोदामांपैकी ३१ गोदाम बांधकामे पूर्ण झाली असून उर्वरीत गोदाम बांधकामाबाबत कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
राज्यातील जिल्हानिहाय साठवणूक क्षमता