३. कल्याणकारी संस्था, वसतिगृहे, आश्रमशाळा इत्यादी संस्थांना बीपीएल दराने धान्य वितरणाची योजना
राज्यातील कल्याणकारी संस्थांना प्रत्येक लाभार्थ्यास (inmates) दरमाह १५ किलो याप्रमाणे धान्याचे वितरण करण्याकरिता केंद्र शासन बी.पी.एल दराने
अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) अतिरिक्त नियतन मंजूर करते. त्यानुसार या विभागाच्या दिनांक २६.४.२००२ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर धान्याचे वितरण करण्यात येते. शासन निर्णय दि.२६.४.२००२ मधील परिच्छेद क्र.४ मध्ये आस्थापना
शिधापत्रिका देण्याची कार्यवाही विषद करण्यात आली आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत आस्थापना शिधापत्रिका धारकांना दरमाह प्रति लाभार्थी १५ किलो धान्याचे प्राप्त नियतनाच्या प्रमाणात वितरण करण्यात येते.
केंद्र शासनाने दि.१८.६.२०१८ रोजीच्या पत्रान्वये माहे एप्रिल, २०१८ ते सप्टेंबर, २०१८ या कालावधीकरिता दरमाह २७३८.६३ मे.टन तांदूळ व ४१०७.९५ मे.टन गव्हाचे नियतन मंजूर केले आहे. त्या अनुषंगाने
प्रत्यक्षात असलेले ४,५६,४३९ लाभार्थी विचारात घेऊन २४६४६.८३० मे. टन गहू व १६,४२७.७१८ मे.टन तांदूळ इतक्या अन्नधान्याचे सहामाही जिल्हावार नियतनास दिनांक ३०.०६.२०१८ च्या पत्रान्वये मंजूरी देण्यात आली आहे.
तसेच केंद्र शासनाने दिनांक १४.०३.२०१९ रोजीच्या पत्रान्वये माहे एप्रिल, २०१८ ते सप्टेंबर, २०१८ या कालावधीकरिता वाटप करण्यात आलेल्या नियतनापैकी ५६०१.४४९ MT तांदूळ व १०४१०.०१६ MT गहू
राज्य शासनाकडे शिल्लक असल्याचे नमूद करून सदर शिल्लक असलेल्या धान्यातून आक्टोंबर २०१८ ते मार्च, २०१९ या सहा माहीचे नियतनाचे वाटप फक्त Government owned/run Hostel and Institutions यांनाच करण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार शासनपत्र दिनांक २९.०३.२०१९ रोजीच्या पत्रान्वये जिल्हावार सहामाही नियतनाचे वाटप करण्याबाबत सर्व संबधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.