राज्यातील बनावट/बोगस/अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता राज्यात सन २००८, २०१० व २०११ मध्ये अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम राबविण्यात आली होती.
सदर मोहीमेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांकडून आवश्यक त्या कागदपत्रांवर विहित नमुन्यात अर्ज भरुन घेण्यात आले होते. ज्या शिधापत्रिकाधारकांनी विहित मुदतीत वरीलप्रमाणे
आवश्यक ती कागदपत्रे व अर्ज भरुन दिले आहेत, त्यांच्या शिधापत्रिका पुर्ववत सुरु करण्यात आल्या. तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांनी वाढीव मुदतीतही अर्ज व कागदपत्रे सादर केली नाहीत त्यांच्या शिधापत्रिका निलंबित/रद्द करण्यात आल्या असून अशा शिधापत्रिकांवरील
शिधावस्तुंचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. रद्द करण्यात येणाऱ्या शिधापत्रिका ज्या दुकानात/केरोसिन परवानाधारकांस जोडण्यात आल्या होत्या त्या रास्तभाव दुकानदारांचे धान्याचे नियतन व केरोसिन परवानाधारकांचे केरोसिनचे नियतन त्या प्रमाणात कमी करण्यात यावे,
अशाही सूचना देण्यात आल्या होत्या.
सन २०११ च्या अपात्र शिधापत्रिका शोध मोहीमेत विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक पुरावे सादर न केल्यामुळे ज्या लाभधारकांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या होत्या
अशा लाभधारकांना दि.१.४.२०१२ ते दि.१५.८.२०१२ या कालावधीत आवश्यक ते विहित नमुन्यातील अर्ज व पुरावे सादर करण्यासाठी विशेष संधी शासनाने दिली होती.