सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्रातील तालुक्यांमध्ये द्वार वितरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गोदामापासून स्वस्त धान्य दुकानापर्यंत शासकीय खर्चाने शासकीय वाहनातून अन्न धान्याची वाहतूक करण्यात येते.
ही योजना, आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आली असून, अवर्षण प्रवण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनमार्फत कार्यान्वित केली आहे.
द्वार वितरण योजना शासकीय वाहनाद्वारे राबविण्यासाठी ही योजना कार्यान्वयन करणार्या यंत्रणांना येणार्या सर्व खर्चाची प्रतिपूर्ती आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील तालुक्यांमध्ये प्रति क्विंटल रू.१५.०० या दराने तर अवर्षण प्रवण तालुक्यामध्ये प्रति क्विंटल रू.१३.०० या दराने करण्यात येते.
फोर्टीफाईड तांदुळ वितरण प्रकल्प (पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ वाटप योजना)
राज्य शासनाव्दारे ॲनिमिया नियंत्रण उपाययोजनांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत फोर्टीफाईड तांदुळ वितरीत करण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सन २०१८-१९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व कुरखेडा या तालुक्यांमध्ये १२ महिन्यांसाठी राबविला आहे.
फोर्टीफाईड तांदुळ वितरण योजना राज्यात राबविण्यास केंद्रशासनाने मान्यता दिली असून आता विस्तारीत स्वरुपात संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात केंद्रसहाय्यीत प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. Rice Fortification and its distribution under Public Distribution System यासाठी केंद्रशासनाने विहीत केलेल्या
Operational and Technical Guidelines नुसार राज्यात राबविण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार टाटा ट्रस्ट व भारत पेट्रोलियम (BPCL) या कंपन्यांद्वारे सामाजिक दायित्वांच्या माध्यमातून (CSR) १०० टक्के आर्थिक सहकार्याने १२ महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत जीवनसत्व बी-१२, फोलिक ऑसिड व लोह या सूक्ष्म पोषक तत्वांनी युक्त असलेले Fortified rice kernels (FRK) १:१०० या प्रमाणात सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरीत करावयाच्या तांदुळात मिसळून तांदुळ वितरीत होणार आहे.
---------