११. आधारभूत किंमत खरेदी योजना
केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजना ही शेतकर्यांच्या हितासाठी आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळया पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहिर करते व याशिवाय आधारभूत किंमतीच्या लाभ होण्याचे दृष्टीने, शेतकर्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने (डीस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये म्हणून शासनातर्फे धान्याची (एफ ए क्यू) खरेदी करण्यात येते. महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची “नोडल एजन्सी” म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पहाते. तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेची शासनमान्य अभिकर्ता संस्थेमार्फत अंमलबजावणी करण्यात येते.
खरीप पणन हंगाम २०१२-१३
२०१२-१३ च्या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत, सर्वसाधारण गुणवत्ता दर्जाच्या (एफ ए क्यू) ज्वारी, बाजरी, मका व भात या धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने बिगर आदिवासी क्षेत्रात, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व आदिवासी क्षेत्रामध्ये (ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गोंदिया चंद्रपूर व ग़डचिरोली इ. जिल्हयांमधील आदिवासी क्षेत्रात) महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांनी खरेदी करण्या बाबतचे आदेश दि. १० ऑक्टोबर, २०१२ रोजी निर्गमित करण्यानत आले आहेत. धान खरेदीचा कालावधी दि. १० ऑक्टोबबर, २०१२ ते ३० सप्टेंेबर, २०१३ व भरडधान्यी खरेदीचा कालावधी दि १० ऑक्टो)बर, २०१२ ते ३१ मार्च, २०१३ निर्धारित केला आहे. त्यानुसार उपरोक्त अभिकर्ता संस्थामार्फत खरेदी करण्यात येत आहे.
केंद्र शासनाने खरीप पणन हंगाम २०१२-२०१३ करीता खालीलप्रमाणे आधारभूत किंमती जाहीर केल्याक आहेत.
केंद्र शासनाच्या खरीप पणन हंगाम २०१२-१३ करिता आधारभूत किंमती
अ.क्र.
|
पीक
|
आधारभूत किंमत
(रूपये प्रति क्विंटल)
|
१
|
धान/भात (एफ.ए.क्यू.)
|
अ) साधारण
|
१,२५०/-
|
|
|
ब)
“अ” दर्जा
|
१,२८०/-
|
२.
|
भरड धान्य (एफ.ए.क्यू.)
|
ज्वारी (हायब्रीड)
|
१,५००/-
|
|
|
ज्वारी (मालदांडी)
|
१,५२०/-
|
|
|
बाजरी/मका
|
१,१७५/-
|
खरीप पणन हंगाम २०१२-१३ मधील धान व भरडधान्य खरेदी (३०.०९.२०१३ पर्यंत)
(आकडे क्विंटल)
अभिकर्ता संस्था
|
धान
|
एकूण धान
|
भरडधान्य
|
“अ” दर्जा
|
साधारण दर्जा
|
ज्वारी
|
बाजरी
|
मका
|
मार्केटिंग फेडरेशन
|
१,१८,४४६.२०
|
१५,५९,३५६.२३
|
१६,७७,८०२.४३
|
६,३७,८७९.४७
|
००
|
८८.००
|
आदिवासी विकास महामंडळ
|
८११.८९
|
११.८१.४२०.१६
|
११.८२.३२२२.०५
|
५६८.००
|
००
|
००
|
एकूण
|
१,१९,२५८.०९
|
२७,४०,७७६.३९४
|
२८,६०,०३४.४८
|
६,३८,४४७.४७
|
००
|
८८.००
|
धान व भरडधान खरेदी
हंगाम २०१२-१३ मधील धान भरडाईचा शासन निर्णय दि.५ डिसेंबर, २०१२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
मागील चार वर्षातील धान व भरडधान्या खरेदीची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे-
(क्विंटलमध्ये)
हंगाम
|
धान
|
भरडधान्य
|
अ दर्जा
|
साधारण दर्जा
|
ज्वारी
|
बाजरी
|
मका
|
२००८-०९
|
७४५५२७
|
९०१०२२
|
५१३४७७
|
८६०३
|
५४८११९
|
२००९-१०
|
१३०३४०३
|
१०२७७३८
|
६३८५
|
३५
|
५४३१५
|
२०१०-११
|
८७७१२
|
१८५२२३४
|
३६५६
|
०
|
२३३१४
|
२०११-१२
|
२९,५५३
|
२५,७०,३८२
|
०
|
०
|
१,३९१
|
गहू खरेदी
आधारभूत किंमत योजनेंतर्गत २०१३-१४ च्या रब्बी पणन हंगामासाठी केंद्र शासनाने गव्हाचे विनिर्देश तसेच, किमान आधारभूत किंमत जाहीर केली असून त्यानुसार राज्यात मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत गव्हाची खरेदी करण्यासाठी दिनांक २८ मार्च, २०१३ च्या शासन निर्णयान्वये आदेश देण्यात आले आहेत. त्यास अनुसरुन मार्केटींग फेडरेशन मार्फत दिनांक ३१.७.२०१३ अखेर २२,९४४.११ क्विंटल गव्हाची खरेदी करण्यात आली आहे.
लेव्ही तांदूळाची वसूली
सन २०१२-१३ या खरीप पणन हंगामात मिलर्सकडून ऐच्छिक स्वरूपात लेव्ही वसूलीचे आदेश दिनांक २७ नोव्हेंबर, २०१२ अन्वपये निर्गमित करण्याित आले तथापि, सदर हंगामात भारतीय अन्न महामंडळाकडे लेव्ही राईस जमा करण्यांत आला नाही.