राज्य ग्राहक हेल्पलाईन
राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर ग्राहकांना
विनाशुल्क टेलीफोनद्वारे त्यांच्या समस्येबाबत असलेली माहिती/सल्ला/मार्गदर्शन मिळण्यासाठी
राज्य ग्राहक हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. राज्य ग्राहक हेल्पलाईन कार्यान्वित
करण्यासाठी केंद्र शासनांकडून रु.१६.२५ (अनावर्ती) रु. ११.३५ लक्ष आवर्ती असे एकूण
रु.२७.६० लक्ष एवढे अनुदान उपलब्ध झालेले आहे. राज्य शासनाने हेल्पलाईन कार्यान्वित
करण्यासाठी कंझुमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई या संस्थेची निवड केली आहे.
राज्य ग्राहक हेल्पलाईन दिनांक १५ सप्टेंबर २०११ पासून कार्यान्वित करण्यात आली असून
या विनाशुल्क हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक १८०० २२ २२६२ हा आहे.
---