राज्य शासनाने विक्रीकर कायद्यात दुरूस्ती करून दि.१.४.१९८९
पासून या कायद्याच्या कलम ३८ नुसार ग्राहकांकडून काही वेळा चुकीच्या आकारणीने विक्रेत्याने
वसूल केलेला व तदनंतर ग्राहकांना परत करणे अशक्य आहे, असा वसूल झालेला विक्रीकर ग्राहक
कल्याण निधी मध्ये जमा करण्यात येतो. या निधीतून ग्राहक प्रबोधन व ग्राहक हिताच्या
विविध उपक्रमासाठी स्वयंसेवी ग्राहक संघटनांना प्रस्तावाची कार्यकक्षा विचारात घेऊन
मर्यादित स्वरूपात अर्थसहाय्य देण्यात येते. त्याशिवाय राज्य शासनाकडून प्रत्येक वर्षी
या निधीला रू.१० लाखाचे अंशदान दिले जाते. या निधीचे व्यवस्थापन विभागाचे सचिव, ग्राहक
संरक्षण विभागाचे सह/ उप सचिव, वित्तीय सल्लागार व उपसचिव व दोन अशासकीय सदस्य यांचा
समावेश असलेल्या समितीकडे सोपविण्यात आले आहे. या समितीवर खालील दोन अशासकीय सदस्यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.
- (१) श्री.बाळासाहेब प्रभुणे, रा. कराड, जिल्हा सातारा.
- (२) श्री.प्रविण हरिभाऊ कुंटे (पाटील) रा. न्यू सोमवारी पेठ, नागपूर-२४.
---