कंझुमर क्लब
केंद्र शासनाच्या कंझुमर क्लब योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे
ग्राहक प्रबोधन करण्याकरिता शाळांमधून कंझुमर क्लब स्थापन करण्यात येतात. ही योजना
१००% केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. शाळांमधून कंझुमर क्लब स्थापन करण्याकरिता केंद्र
शासनाकडून अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते . सन २०१०-११ या वर्षाकरिता राज्यात ५०० कंझुमर
क्लब स्थापन करण्यासाठी २२ संस्थांचे प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर केले असून त्यासाठी
रू.५० लक्ष इतके अनुदान मंजूर केले आहे.
---