Government of Maharashtra
../../image/blueheader-left.jpg अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग ../../image/blueheader-right.jpg
Time वितरणा संबधित बाबीवरील तक्रारीसाठी नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक १८००-२२-४९५० १९६७ (बीएसएनएल आणि एमटीएनएल ग्राहकांसाठी) आणि वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन नं. १४४४५
परिचय

      कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे.


विभागाची मुख्य उद्दिष्टे.
  • लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करणे.
  • जीवनावश्यक वस्तू रास्त दराने सहज उपलब्धतेची खात्री करणे.
  • सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी साठवण क्षमतेची निर्मिती करणे.
  • ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ ची अंमलबजावणी करून ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करणे.


विभागाची रचना
         या विभागाच्या प्रशासकीय कक्षेत खालील उप विभाग काम करतात.
  • (१) राज्य आयोग व जिल्हा मंच यांची कार्यालये
  • (२) मुंबई ठाणे क्षेत्रातील शिधापुरवठा यंत्रणा
  • (३) विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे पातळीवरील पुरवठा कार्यालये
  • (४) संचालक, नागरी पुरवठा (गोदाम आणि वाहतूक), मुंबई
  • (५) पुरवठा आयुक्तांचे कार्यालय
  • (६) नियंत्रक, वैधमापनशास्त्र, मुंबई यांचे अधिपत्याखालील विभागीय व जिल्हा कार्यालये
  • (७) वित्तीय सल्लागार व उपसचिव यांचे कार्यालय


विभागासाठीची एकूण मंजूर पदे
अ.क्र. कार्यालयाचे नांव गट-अ गट-ब गट-क गट-ड एकूण
१. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (खुद्द) १६ ९० ६९ २६ २०१
२. नियंत्रक शिधावाटप, मुंबई १५२३ ३५२ १८९०
३. संचालक, नागरी पुरवठा (गोदाम/ वाहतूक) मुंबई ७९ २३ १०५
४. विभागीय / जिल्हा पुरवठा कार्यालये ११७ २२६ ३१०२ १२७६ ४७२१
५. पुरवठा आयुक्त कार्यालय, मुंबई ६८ ८३
६. ग्राहक संरक्षण यंत्रणा ४३ ३५३ ९७ ४९७
७. नियंत्रक, वैधमापनशास्त्र, मुंबई ४७ ६१८ २७० ९४४
८. वित्तीय सल्लागार व उपसचिव, मुंबई १२५ २० १५६
एकूण १६५ ४२२ ५९३७ २०७३ ८५९७








../../image/bluefooter-left.jpg
Disclaimer | Privacy Policy | Terms of Use | Hyperlinking Policy
Developed by National Informatics Centre,Mumbai.
../../image/bluefooter-right.jpg