राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 मधील तरतूदीनुसार हक्क असलेले अन्नधान्य किंवा आहार त्याच्या वितरणासंबंधी बाबीमध्ये वंचित झालेल्या व्यक्तीची तक्रार शीघ्र व प्रभावी रितीने दुर करण्यासाठी प्रकरण 5 नुसार तक्रार निवारण व्यवस्था कार्यान्वीत करावयाची आहे. सदर अधिनियमाच्या कलम 15 नुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कलम 16 (1) नुसार राज्य अन्न आयोग गठीत करण्यात आला आहे.
         
मुंबई- ठाणे शिधावाटप क्षेत्राकरीता मुंबई, मुंबई-उपनगर व ठाणे या जिल्हयातील अप्पर जिल्हाधिकारी त्या त्या कार्यक्षेत्रा करीता “जिल्हा तक्रार निवारण अधिकारी ” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांकरिता संबंधीत जिल्हयांतील अन्नसुरक्षा योजनेशी संबंधीत नसलेले अप्पर जिल्हाधिकारी यांची “जिल्हा तक्रार निवारण अधिकारी” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
         
जिल्हा तक्रार निवारण अधिकारी संपर्क
राज्य अन्न आयोग(अधिसूचना)
         
कलम 16 (1) नुसार अधिनियमाच्या अंमलबजावणीवर संनियंत्रण व पुनर्विलोकनाच्या प्रयोजनार्थ खालील प्रमाणे राज्य अन्न आयोग गठीत केला आहे. सदर आयोग अधिनियमाच्या कलम 16(6) नुसार विहीत केलेली कार्ये पार पाडणार आहे.
(कार्यकक्षा-शा.नि.दि.१४ ऑगस्ट २०१७)
अनु.क्र. |
नाव |
पदनाम |
1 |
श्री. महेश ढवळे |
अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार २९.१०.२०२१) |
2 |
श्री. महेश ढवळे |
सदस्य |
3 |
श्रीमती प्रिती बैतुले |
महिला सदस्य |
4 |
रिक्त |
सदस्य |
5 |
रिक्त |
सदस्य (अनुसूचित जाती ) |
6 |
रिक्त |
सदस्य (अनुसूचित जमाती ) |
7 |
सह सचिव/ उप सचिव, अ.ना.पु.व.ग्रा.सं.वि. |
सदस्य सचिव |