एक देश एक शिधापत्रिका
-
एक देश एक शिधापत्रिका ही योजना 1 जानेवारी, 2020 पासून राज्यात लागू करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या या योजनेतंर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणीकरण करुन लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे.
-
राज्यातील रास्तभाव दुकानांतून स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी इ. स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतरणाच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानांत त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य प्राप्त करुन घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणिकरणाद्वारे धान्य वितरीत करण्यात येते.
-
या योजनेतंर्गत माहे जानेवारी, 2020 ते माहे डिसेंबर, 2023 पर्यंत महाराष्ट्रातील 64854 शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांनी बाहेरील राज्यांमध्ये धान्याची उचल केली आहे, तसेच इतर राज्यातील 521696 शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची उचल केली आहे.
- एक देश एक शिधापत्रिका योजनेमध्ये राज्यांतर्गत सरासरी 10 लक्ष / प्रति महिना लाभार्थ्यी अन्नधान्याची उचल करत आहेत.
- एक देश एक शिधापत्रिका या योजनेच्या माहितीकरिता हेल्पलाईन क्र. 14445 कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
लाभार्थी:
सर्व राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभार्थी (स्थलांतरित श्रमिक, आदिवासी, इ.)
फायदे:
रेशन कार्डच्या प्रकारानुसार (अ.अ.यो./प्रा.कु.यो.)
अर्ज कसा करावा
स्थलांतरित लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतराच्या ठिकाणी कोणत्याही रास्त भाव दुकानात ई-पॉस उपकरणांवर पोर्टेबिलिटीद्वारे त्यांचे हक्काचे अन्नधान्य प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.