बंद

    अर्थसहाय्यित खाद्यतेल वितरण योजना (सन २०११-१२)

    केंद्र शासन अर्थ सहाय्यित सवलतीच्या दराने पाम तेल वितरीत करण्याची योजना राज्यात राबविण्यात येते. केंद्र शासनाने राज्यास माहे एप्रिल, २०११ ते सप्टेबर, २०११ या महिन्याकरिता एकूण ८७,७४० मे.टन पामतेलाचे नियतन मंजूर केलेले आहे. केंद्र शासनाने मंजूर केलेले पामतेल माहे जुलै, २०११ ते डिसेंबर २०११ या कालावधीत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येत आहे. आयातीत पामतेल लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत राज्यातील अन्नपूर्णा, अंत्योदय, बीपीएल व एपीएल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह एक लिटर रूपये ४५/- प्रतिलिटर या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येत आहे. योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र शासनाच्या संस्थेकडून प्राप्त होणार्‍या पामतेलाचा दर, तेलाची वाहतूक, हाताळणूक, इतर अनुषंगीक खर्च, रास्त भाव दुकानदारांचे मार्जीन व वाहतूक रिबेट इ. बाबी विचारात घेऊन परिगणनेअंती येणारी अंतिम किंमत व प्रत्यक्ष विक्री दर (रू.४५/- प्रतिलिटर) यातील फरकाच्या रकमेचा भार राज्य शासनामार्फत सोसण्यात येत आहे.